“जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस..”; मंत्रीमंडळात डावलल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार(political consulting firms) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेवर आज (16 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, असं संतापून भुजबळ म्हणाले.

तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली…भुजबळ कधी संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या बोलण्यातून ते कमालीचे नाराज झाले असल्याचं दिसून येतंय.

पुढे त्यांनी विधानसभेत(political consulting firms) मिळालेल्या यशाबद्दल देखील भाष्य केलं. मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा देखील पाठिंबा आहे.”, असं भुजबळ म्हणाले.

इतकंच नाही तर, आज दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असं ते पत्रकरांना म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहे. त्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो का नाही?, असा सवाल देखील माध्यम प्रतिनिधींनी भुजबळ यांना केला. त्यावर त्यांनी बॅनरवर जागा नसेल, असं खोचक उत्तर दिलं.

तसेच, मला मंत्रिमंडळात का घेतले गेले नाही, हे त्यांना विचारा. पक्षाच्या नेत्यांना विचारा. त्याचे उत्तर मी कसे देऊ, असंही भुजबळ म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून ते कमालीचे नाराज असल्याचं आता स्पष्ट झालंय. आता छगन भुजबळ पुढे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आज छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

हेही वाचा :

डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप?

कॉमेंटेटरने केली जसप्रीत बुमराहवर टीका! टीव्हीवर मागितली माफी, Video Viral

जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्… Video