थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा…

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळवल्यानंतर(claim) गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षात अस्वस्थता दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून परस्परविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. छोटा भाऊ व मोठा भाऊ यावरून आता महायुतीमधील घटक पक्षांत चांगलीच जुंपली आहे.

त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे(claim) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइक रेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्षात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मोठा भाऊ कोण यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 तर अपक्षाला एक जागा मिळाली.

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये या निवडणुकीत तब्बल 28 जागा भाजपने लढल्या होत्या, त्यापैकी केवळ 9 जागी विजय मिळवता आला. त्यानंतर 15 जागी निवडणूक लढविताना शिवसेना शिंदे गटाने 7 जागी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 पैकी एक जागा जिंकली आहे. त्यामुळे सध्या जोरात चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 8 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट जवळपास 80 टक्के इतका राहिला. दुसरीकडे त्या खालोखाल काँग्रेसने जवळपास 17 जागा लढल्या होत्या तर 13 जागी विजय मिळवला त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट जवळपास 76 टक्केच्या आसपास राहिला.

शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढल्या त्यापैकी 7 जागा जिंकल्या त्यांचा स्ट्राइक रेट 47% इतका आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढल्या तर त्यापैकी 9 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट 43% च्या आसपास राहिला. भाजपने 28 जागा लढल्या होत्या, त्यापैकी केवळ 9 जागी विजय मिळवला त्यांचा स्ट्राइक रेट 31.33% इतका आहे. सर्वात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 जागा लढल्या होत्या. त्यामधील एक जागा जिंकल्याने स्ट्राइक रेट 25 टक्के इतका आहे.

या निवडणुकीत महायुतीमध्ये घटक पक्षांत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइकरेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांनी केलेला दावा भाजप येत्या काळात मान्य करणार का ? हा दावा फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत महायुतीमध्ये घटक पक्षांत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइकरेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांनी केलेला दावा भाजप येत्या काळात मान्य करणार का ? हा दावा फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

वंचितला सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर

विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

लोकसभेला अपमान झाला म्हणूनच… हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा