मराठा आरक्षण लढ्याचे नेते(Big news) मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील तिसरा गुन्हा दाखल झालाय…किनगाव उदगीर ग्रामीण पाठोपाठ लातूर शहरात ही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ओबीसी समाज बांधव यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार(Big news) दाखल केली होती…गुन्हा दाखल होईपर्यंत ओबीसी समाजाने पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान यानंतर मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबतचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्य आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.. मात्र या घटनेचा आधार घेत मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सातत्याने वंजारी समाजावर टीका करत आहे.
समाजाचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. एवढेच नाही तर समाजातील अधिकारी कर्मचारी यांना लक्ष केलं जात आहे. वंजारी समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं जात आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अशा आशयाची तक्रार गोविंद केदार यांनी लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कलम 352 351/2, 351/3, आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचा अदखलपात्र गुन्हा दाखल.लातूर जिल्ह्यातील हा तिसरा गुन्हा आहे. दोन दिवसापूर्वी किनगाव पोलीस ठाण्यात काल उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :
करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!
…तर नवी कार खरेदी करणं अशक्यच; सरकारच्या नव्या धोरणामुळे होऊ शकतो अनेकांचा स्वप्नभंग
युजवेंद्र चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा घटस्फोट!