मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या(decisions)मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला आज औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडोर प्रकल्पालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. एकूण 7 निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून, यामध्ये स्वयंरोजगारासाठी आर्थिक कर्ज, महामंडळाच्या जमिनींचा वापर, कुष्ठरुग्णांसाठी अनुदान वाढ यांसारखे जनहिताचे मुद्दे सामावले आहेत. या धोरणामुळे राज्यातील तरुणांना नवउद्योजक होण्यास प्रोत्साहन मिळणार असून आर्थिक पाठबळही मिळणार आहे.

कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या स्टार्टअप धोरणांतर्गत 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज केवळ 3% व्याजदराने दिलं जाणार आहे. (decisions)सुरुवातीस 5 लाख तरुणांना निवडून कर्ज वितरित करण्यात येणार असून, ITI पास किंवा कोणताही ग्रॅज्युएट युवक-युवती अर्ज करू शकतील.स्टार्टअपमधील अयशस्वीतेची शक्यता लक्षात घेता, या योजनेतून युवकांचं वय वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी स्पष्ट केलं. केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनांशी देखील हे धोरण संलग्न राहील.

– वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग भरवीर जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडोरला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी भूसंपादन व आखणी सुरू करणार आहे.
– एमएसआरटीसीच्या ST महामंडळ अतिरिक्त जमिनींवर व्यापारी उपयोगाची मंजुरी देण्यात आली असून, आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे.
– राज्य शासनाच्या लँड लॉक्ड भूखंडांच्या वाटपासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे.
– नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1,124 कामगारांना 50 कोटींचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून उभारण्यात येणार आहे.
– जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेळाच्या मैदानाचं आरक्षण रद्द करून, ते रहिवासी झोनमध्ये समाविष्ट करण्यास नगरविकास विभागाची मान्यता.
– कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आली (decisions)असून, पूर्वीचं ₹2,000चं अनुदान आता ₹6,000 करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून… नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो
ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?