काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा अपघात(accident) झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही कार मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा चालवत होता. ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी पहाटे 2:40 वाजता ही घटना घडली आहे. ध्रुव नलिन गुप्ता याच्यावर बेदरकारपणे पोर्श चालवून पार्क केलेल्या अनेक बाईक्सला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधू वासवानी चौकाजवळील पदपथावर अनेक दुचाकी उभ्या असताना भरधाव वेगाने येणाऱ्या या पोर्श कारने त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताचा(accident) सीसीटीव्ही समोर आला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या कारमध्ये चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जण होते. ध्रुव गुप्ता याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून गाडी चालवताना त्याने दारू प्यायलेली का याचा तपास सुरू आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीने अपघात झाल्यानंतर एक बाटली बाहेर फेकल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
हेही वाचा :
एआर रहमान करिअरला ब्रेक? घटस्फोटानंतर मोठा निर्णय?
WhatsApp युजर्ससाठी टायपिंगचे नवे फीचर, अॅक्टिव्ह कसे करावे?
शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार