मोठी बातमी! पंजाबमध्ये खाजगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

भटिंडा: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाब राज्यातील भटिंडा येथे एका खाजगी बसला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भटिंडा जिल्ह्यातील तळवंडी – साबो रस्त्यावर एका खाजगी बसला अपघात झाला आहे. बस या रस्त्यावरील एका पूलाला जाऊन आदळली आहे. त्यानंतर ही बस थेट पूलावरून नदीत कोसळली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी(passengers) अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

तळवंडी ते साबो असा प्रवास करणाऱ्या एका खाजगी बसला अपघात झाला आहे. अपघात इतका भयानक होता की बस थेट नदीत जाऊन कोसळली आहे. या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा(passengers) मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे कळते आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांवर ताळवंडी येथी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, एक खाजगी बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. त्याच वेळी एका गावाजवळ असलेल्या पुलावर बसचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती बस थेट पूलावरून खाली नदीत कोसळली. अपघताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर अवशेक यंत्रणा त्या ठिकाणी आल्या आणि बचावकार्यास सुरुवात झाली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स लक्झरी बस ने समोर चाललेल्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. विक्रम मोहन जगताप (वय ३४, राहणार भातागळी तालुका लोहारा. जिल्हा धाराशिव.) असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (दि २५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या आसपास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळील हॉटेल विसावा जवळ घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोलापूर वरून खाजगी ट्रॅव्हल्स बस ही पुण्याला जात असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळ आल्यावर ही बस समोरून जात असलेल्या ट्रकला जाऊन पाठीमागे धडकली.

या खाजगी बसचा वाहन चालक हा भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने तो समोर जात असलेल्या ट्रकला जाऊन धडल्याने हा अपघात झाला. अशी माहिती प्रथमदर्शीय प्रवाशांनी पोलिसांना दिली. या अपघातात दत्ता साहेबराव शेंगोळे (रा. शेंगोळे ) संध्या पांचाळ, अमोल पंचाळ (दोन्ही रा. पुणे ) ,शामल रोडगे, महेश रोडगे दोन्ही (रा. उदगीर ), मैनाबाई आदमाने,मीनाक्षी पाटील, शाहुराज पाटील, सुभाष माने , विमल दिवटे ( सर्व रा. लातुर ) या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

हेही वाचा :

CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात…

‘प्लीज शुभमन गिलला बोलवं’, मुलींच्या विनंतीवर रोहित शर्मानं दिलं मुंबई स्टाईल उत्तर

 ‘…त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा’; आंबेडकरवादी संघटनांची मागणी