राजकीय वर्तुळातून खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे.(faction)शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. ओंकारेश्ववर मंदिर परिसरात असलेल्या राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. याची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी अनंत जोशी यांना तात्काळ रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, त्यांनी आयुष्य का संपवलं? याचा तपास सुरू आहे.

अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना गटाचे नगरसेवक यासह महापालिकेचे गटनेतेही होते. १० दिवसांपूर्वी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. (faction)त्यानंतर त्यांनी राहत्या घरात टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांसह विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकांऱ्यांनी रूग्णालयात जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं.

घटनेच्या दिवशी ते घरातच होते. मात्र, त्यांनी राहत्या घरात आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अनंत जोशी यांना रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे. (faction)दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी कोणत्या तरी कारणावरून विवंचनेत होते. मात्र, टोकाचं पाऊल उचलतील, असं वाटलं नव्हतं, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष