विधानसभा निवडणूक रणसंग्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय(political advertising) वर्तुळात अनेक उलथापालत सुरु होताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेनेचेमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे.
उदय सामंत म्हणाले की, आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. कोकणातील ग्रामपंचायत निवडणूकीत(political advertising) पहिल्यांदा शिवसेना निवडून आली त्याचं सगळं श्रेय आबा घोसाळे यांना जातं. रत्नागिरीतील ग्रामपंचायतीत शिवसेना येण्यामागे आबांचा मोलाचा वाटा होता. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आबांनी शिवसेना पक्ष वाढावा यासाठी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्यासारखं हरहुन्नरी व्य़क्तीमत्त्व आज महायुतीत प्रवेश करत आहे याचा अत्यंत आनंद होत आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयसिंग घोसाळे उर्फ आबा घोसाळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. उदय सामंत म्हणाले की, जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आहे ती शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे.
धनुष्यबाणाची आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आबांना जसं शिवसेना पुढे घेऊन जा असं सांगितलं होतं तसंच त्याचप्रमाणे शिवसेना कधीच क्राँग्रेसबरोबर एक होऊ शकत नाही असंही म्हणाले होते. त्यांचा हाच विचार शिवसेना शिंदे गट पुढे नेत आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्याचपद्धतीने मणी शंकर अय्यरने जेव्हा सावरकरांबद्दल अपशब्द उच्चारले होते तेव्हा बाळासाहेबांनी त्याला पायातली चप्पल काढून मारलं होतं.
हा इतिहास शिवसेनेचा आहे. तीच शिवसेना आबा घोसाळेंना अभिप्रेत आहे आणि म्हणूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान पक्षप्रवेशानंतर जयसिंग घोसाळे म्हणाले की, आता पालकमंत्री तथा उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. तसंच तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचेही आबा घोसाळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:
महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का
आरक्षणाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कॉँग्रेस 50 टक्के..”
कोल्हापुरात राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे; भाजपा कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये जोरदार झटापट