Disapproved अर्जाबाबत मोठी अपडेट! लाखो लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये

पुणे : सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या(online application) पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जात आहेत. सध्या सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर टाकले आहेत. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांंना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील. दरम्यान, काही महिलांच्या अर्जात काही त्रुटी असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले आहेत. अशा महिलांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी(online application) अर्ज करणाऱ्या महिलांना काही अडचणी येत असतील तर त्या नारीशक्ती अॅप किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन त्रुटी असलेले अर्ज पुन्हा सादर करू शकतात. सरकारने तशी संधी महिलांना अपलब्ध करून दिली आहे. याबाबतची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली आहे.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही बॅंक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करुन घ्यावे. नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्जाची सद्यस्थिती ‘डिसअॅप्रुड’ अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती अॅपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरुन लॉगिन करुन एडिट या ऑप्शनवरुन कागदपत्रांची त्रुटी दूर करुन अर्ज पुन्हा अपलोड करावे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला असेल त्यांनीदेखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडीट करुन त्रुटी दूर करता येणार आहे.

अर्जाची सद्यस्थिती ‘रिजेक्टेड’ असे दिसल्यास अशांचे अर्ज बाद करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, याबाबत नोंद घ्यावी, असेही श्री. गिरासे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

इचलकरंजी युवतीच्या विनयभंगप्रकरणी महिलांचा संताप!

“आरोपीला फाशी होईपर्यंत..”; भर पावसात सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, आदित्य ठाकरेंविरोधात टाकला मोठा डाव?