पाटणा : भाजप नेत्याची(political news todays) अज्ञातांनी गोळी मारुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. पाटण्यातील सिटी मंगल तलावाजवळ मनोज कमलिया गेटजवळ भाजप नेत्यावर गोळीबार झाला.
गोळीबारात मृत्यू झालेले श्याम सुंदर उर्फ मुन्ना शर्मा हे भाजपचे (political news todays)पाटणा सिटी चौकचे माजी नगर मंडळ अध्यक्ष होते. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मृत श्याम सुंदर उर्फ मुन्ना शर्मा यांच्या एका मित्राने सांगितलं, की आम्ही दररोज सकाळी मंगल तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी येत होतो. सकाळी आम्ही आलो, त्यावेळी त्यांची हत्या झाल्याचं समजलं. त्यानंतर या भागात जे कॅमेरे लावले आहेत, ते काढून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं.
त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये असं दिसतंय, की मुन्ना शर्मा मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडले आणि कोणाशी तरी ते बोलत होते. त्याचवेळी काही जण बाईकवरुन आले आणि श्याम सुंदर यांच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न केला, मोबाईल खेचला आणि त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या डोक्यात डोळी झाडून तेथून पसार झाले.
मात्र आता त्यांच्या मृत्यूनंतर ही घटना चोरीच्या उद्देशाने की काही घातपाताचा प्रकार होता याचा तपास सुरू आहे. कारण मुन्ना शर्मा यांच्या गळ्यातील चेन गोळीबार करणाऱ्यांनी चोरली नव्हती. मुन्ना शर्मा यांच्यावर मागून डोक्यात गोळी झाडली गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आता तपासानंतरच नेमकं त्यांच्या हत्येमागचं कारण समोर येईल.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुन्ना शर्मा यांच्या कुटुंबात काही कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईकदेखील पोहोचले होते. काही नातेवाईकांना रिक्षापर्यंत सोडण्यासाठी ते बाहेर आले होते. त्यावेळी त्यांची गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न झाला, त्यांनी याला विरोध केल्यानंतर बाईकवरुन आलेल्या लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा:
‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल
पोलिसांकडून सुरू होती गुन्हा घडण्याची प्रतीक्षा..!
सिंघम अगेनचा क्लायमॅक्स 500 राक्षसांसह दिसणार