भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण(leadership assessment) चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अशात आता लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

भाजप म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठतं. त्यामुळं भाजपचे (leadership assessment) एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही. त्यांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार असल्याचं दिलीप देशमुख यांनी म्हटलंय. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचं टेंशन वाढलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही असा निर्धार लातूर ग्राणीच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अहमदपूर भाजपने घेतलेले या भूमिकेमुळे अजित पवार यांना यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही कार्यकर्त्यांना याविषयी योग्य ती समजून काढली जाईल अशी भूमिका घेतली होती. यानंतरही भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीविरोधात वक्तव्य केलं आहे.

अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपला पडलं नाही. यामुळे भाजपच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला, असंही देशमुख म्हणालेत.

अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे. मात्र निधी वाटपात भाजपच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा:

धमाकेदार आठवडा! तब्बल 5 तगडे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची हीच नामी संधी

ताराराणी पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढवणार! इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमध्ये….

“ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी सर्वांत शांत झोपलो…”; भाजप नेत्याची तुफान राजकीय टोलेबाजी