भिंडेवर भाजपचाच वरदहस्त; सुनील राऊत यांनी दिले पुरावे

भावेश भिंडे, झेंडे की फेंडे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना दररोज हजारो लोक(people) भेटायला येत असतात.

त्यामुळे एक फोटो सापडला म्हणून त्यावरून राजकारण काय करता, असा सवाल करत या भिंडेवर भाजपचाच वरदहस्त असल्याचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पुराव्यांसह सांगितले. भावेश भिंडेचे भाजपच्या पदाधिकाऱयांसोबत अनेक फोटो आहेत. हे होर्डिंग भाजप-मिंधे सरकारच्या काळातीलच असून भाजपच्या आशीर्वादानेच भिंडेचा व्यवसाय चालला आहे. (people)

घाटकोपर प्रकरणी ट्विट करण्याची जी तत्परता भाजपच्या पोपटलालांनी दाखवली ती तत्परता खारघरला पाण्याविना अनेक लोक तडफडून मरण पावले तेव्हा का दाखवली गेली नाही, असा सवाल करताना घाटकोपरच्या दुर्घटनेत जे जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

मृतांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे सुनील राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा :

कोल्हापुरात, तारेवरची नव्हे चक्क रस्त्यावरची कसरत!

कोल्हापुरमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये