मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात(politics) विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. त्यातच आता राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपमधून बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडत असल्याची टीका भाजप सोडत असलेल्या ढोबळेंनी केली. लक्ष्मण ढोबळे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतेच ढोबळे यांनी भाजपचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट केली होती.
भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला(politics) सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
यावेळी लक्ष्मण ढोबळे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत जोरदार निशाणा साधला. अजित पवारांना वाटतं की, पैशांचा जीवावर राजकारण करता येतं. मात्र, तसं होत नाही. तुमच्या काकांनी कसे राजकारण केलं ते पाहा, असा सल्लाही ढोबळे यांनी अजित पवारांना दिला.
लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 1 पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. तर, राष्ट्रवादीत असताना ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
हेही वाचा:
अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ
मुंबईच्या आयुष म्हात्रेचा तडाखा; महाराष्ट्राविरुद्ध शतकी खेळीने रचला इतिहास
‘बाळा, आयुष्य खूप लहान आहे…’; फटाके फोडताना चिमुकल्याच्या धाडसामुळे नेटकऱ्यांचा संताप