Bless You! आणि Sorry! एखाद्याला शिंकल्यावर आपण हे दोन शब्द का म्हणतो?

आपण सगळेच कधी ना कधी हे अनुभवतो की एखाद्याने शिंक दिली,(point) आणि लगेच त्यांनी “सॉरी” म्हटलं आणि बाजूच्याने “ब्लेस यू” किंवा “गॉड ब्लेस यू” म्हणून प्रतिसाद दिला. पण या छोट्याशा संवादामागे काय खरं कारण आहे? ही एक सवय आहे की यामागे काही इतिहास आणि विचारसरणी आहे? चला, या गंमतीदार विषयाबद्दल जाणून घ्या.शिंक येणं ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. आपल्या नाकामधील श्लेष्मा झिल्ली जेव्हा धूळ, धुर, परागकण किंवा एखाद्या विषाणूमुळे चिडते, तेव्हा शरीर त्याला बाहेर टाकण्यासाठी शिंकते. यामुळं हवेतील सूक्ष्म कण आपल्यापासून दूर जातात म्हणजे शिंकणं हे खरंतर शरीराचं “सेल्फ-क्लीनिंग” यंत्र आहे.

एखादा जण शिंकतो आणि लगेच म्हणतो “सॉरी” किंवा “एक्सक्यूज मी” ही एक प्रकारची मॅनर्सची भावना आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी शिंकणं दुसऱ्यांना अस्वस्थ वाटू शकतं (point)किंवा रोगजंतू पसरवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नकळत कोणाला त्रास दिला असेल, यासाठी सॉरी म्हटलं जातं. ही सवय सभ्यतेची खूण आहे.

“God Bless You” म्हणायची पद्धत फार जुनी आहे. पूर्वीच्या काळात अशी समजूत होती की शिंक दिल्यावर माणसाचा श्वास क्षणभर थांबतो त्यामुळे त्या व्यक्तीला “गॉड ब्लेस यू” म्हटल्याने त्याला दैवी संरक्षण मिळेल, अशी धारणा होती. आजच्या काळात ही एक सहानुभूतीची आणि काळजीची पद्धत झाली आहे. (point)कोणी शिंकला तर आपण “ब्लेस यू” म्हणतो, म्हणजे “तू ठीक आहेस ना?”, “काळजी घे”, असं न सांगता सांगतो.एकंदरीतच काय शिंक ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया असली, तरी त्यामधून आपल्या संस्कृतीतील माणुसकी, सभ्यता आणि संवेदनशीलतेचं एक साधं पण सुंदर उदाहरण आहे. पुढच्या वेळी कोणी शिंकेल, तेव्हा “ब्लेस यू” नक्की म्हणा आणि जर तुम्ही शिंकत असाल, तर “सॉरी” सुद्धा म्हणा.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे