शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(register definition) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन(register definition) संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी दिली आहे.
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे पुन्हा दिसून आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संजय राऊत यांनी निंदनीय व्यक्त केले आहे. याविरोधात कुंडलिंक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करणार आहे. या वाचाळ व्यक्तीला लगाम घालण्याची विनंती करणार आहोत, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी अहमदनगर येथे नरेंद्र मोदी यांच्याविषयी गाडून टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता या वक्तव्याविरोधात भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, महाराष्ट्राच्या मातीत गाडू..अशा प्रकारचे वक्तव्य करून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.
हेही वाचा :
मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रंचड नाराज
‘या’ अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी
निकालाआधीच लागले विजयाचे बॅनर; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा…