राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना घडत आहेत.(into) दरम्यान आता चोरट्यांनी चार बंद फ्लॅट फोडून १५ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला आहे.
घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट, चार फ्लॅट फोडले; लाखोंचा ऐवज चोरला
संग्रहित फोटो

पुणे : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चार बंद(into) फ्लॅट फोडून चोरट्यांनी १५ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला आहे. वारजेत भरदिवसा घरफोडी करून ७ लाख ७५ हजारांचा तर बिबवेवाडीत वॉईन शॉप फोडत रोकड व इंग्लिश दारूच्या बॉटल असा ७ लाखांचा ऐवज पळविला आहे. इतर दोन घटनांत किरकोळ ऐवज चोरट्यांच्या हाती लागला आहे. दरम्यान, घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात प्रसन्ना सदाशिव जंगम (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे.(into) त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वारजे गावठाण येथील पृथक कॉर्नर येथील एका इमारतीत राहतात. तक्रारदार कुटूंबियासह एका नातेवाईकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, लाकडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा ७ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
वारजेसोबतच विश्रांतवाडी येथील कळसमधील एका सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. चोरट्यांनी येथून ११ हजार ८५ रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कात्रज-कोंढवा रोडवरील वाहनांचे टायर विक्रीचे दुकान फोडून ५८ हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : मुलगा अन् दोन नातीच्या मृत्यूच्या धक्क्याने अखेर आजोबांनीही सोडले प्राण; बारामतीतील घटना
वाईन शॉपी फोडली; इंग्लिश दारूच्या बॉटल चोरल्या
पुणे शहरात चोरट्यांकडून बंद घरांसोबतच आता दारूचे दुकाने देखील फोडली जात आहेत. बिबवेवाडी येथील कोठारी ब्लॉक येथील सोसायटीत असलेले क्रिस्टल वाईन शॉप चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व आतील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्यातून रोकड आणि इंग्लिश दारूच्या बॉटल असा एकूण ७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र लोंढे (वय ५५) यांच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे.
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा