शेअर बाजारात काल किंचीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. (consumers reports)हिंद युनिलिव्हर, टाटा कंझ्युमर आणि नेस्ले हे शेअर्स काल आघाडीवर होते. बीईएल , टेक महिंद्रा आणि ओएनजीसी यांना विक्रीच्या दबावाचा फटका बसला.

८ जुलै रोजी आज मंगळवारी शेअर बाजार कसा असणार आहे आणि कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (consumers reports)त्यांच्या अनेक व्यापारी भागीदार देशांवर कर लादण्याच्या घोषणेनंतर जागतिक बाजारातील मिश्र संकेतांचा मागोवा घेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, ८ जुलै रोजी आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड आज देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,४९५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा(consumers reports) जवळजवळ ४४ अंकांनी कमी होता. सोमवारी देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. सोमवारी, भारत-अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे देशांतर्गत शेअर बाजार स्थिर राहिला. याशिवाय शेअर बाजार बंद होताना देखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीत वाढ झाली.
सोमवारी ७ जुलै रोजी सेन्सेक्स ९.६१ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून ८३,४४२.५० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ०.३० अंकांनी वाढून २५,४६१.३० वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ८२.७० अंकांनी किंवा ०.१५% ने घसरून ५६,९४९.२० वर बंद झाला. त्यामुळे आज शेअर बाजार कसा असणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक व्हीएलए अंबाला यांना अपेक्षा आहे की निफ्टी ५० ला आजच्या बाजार सत्रात २५,३३० आणि २५,१८० च्या दरम्यान आधार मिळेल आणि २५,५१० आणि २५,६३० च्या दरम्यानच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागेल.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार काही स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकता. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी टाटा मोटर्स, टायटन, नॅव्हिन फ्लोरिन, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, फिनिक्स मिल्स, पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स, एसपीएमएल इन्फ्रा हे शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना रतनइंडिया पॉवर , इमामी आणि डीबी रियल्टी या शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी एरिस अॅग्रो लिमिटेड (सीएन), आयएनडी स्विफ्ट लॅबोरेटरीज, हुहतामाकी इंडिया , ब्लिस जीव्हीएस फार्मा आणि डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या शेअर्सची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी रतनइंडिया पॉवर , टीटीएमएल आणि जैन इरिगेशन या शेअर्सची शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं