देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महायुती सरकार(current political news) स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र विधीमंडळाच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. नागपुरच्या राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधीची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. राज्यभरात कोणकोणाच्या गळ्याच मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. राज्यभरातून महायुतीचे नेते शपथविधीसाठी नागपुरात दाखल होऊ लागले आहेत. अशातच भाजपने आपला आणखी एक डाव टाकला आहे.
भाजपचे(current political news) विद्यमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2029 मध्ये शतप्रतिशत भाजप म्हणजेच महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचेही भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच यावेळी रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचेया प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2029 मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देणार असल्याचे समोर आले आहे. एकट्या भाजपचे 200हून अधिक आमदार निवडून आणण्याचे असे उद्दीष्ट आहे.
20 सप्टेंब 1970 रोजी मुंबईतील कल्याणमध्ये रविंद्र चव्हाण यांचा जन्म झाला. 2009, 2014, 2019 आणि 2024 या चार टर्ममध्ये ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली.
2022 मध्येही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, 2014 पासून 2024 पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी कामगिरी बजावली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन आघाडीलाही माती चारली. पण आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी न घेता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :
आज मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी;
मुलांना नाही आवडत मुलींच्या ‘या’ 5 सवयी, बनतात ब्रेकअपचं कारण
मोबाईल फोन जप्त केल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकांवर केला चाकूने हल्ला, Video Viral