सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ(Video) व्हायरल झाला आहे याचा कोणी विचारही केला नसावा. इथे नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ शेअर केले जातात मात्र आता इथे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुमचे होश उडवेल. उंट वाळवंटात आढळतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हा वाळवंटातील पाणी चक्क हवेत उडताना दिसून आला. ज्याने हे दृश्य पाहिले त्याच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले. हा व्हिडिओ दुबईतील एका मॉलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये(Video) एक उंट पॅराशूटमध्ये बांधलेला असून तो उडताना दिसत आहे. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी मॉलमधील शेकडो लोक तिथे उपस्थित झाली आणि या दृश्याचा आनंद लुटत राहिली. यावेळी अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरातही कैद केले. उंटाचे असे हवेत उडणे अशक्य ज्यामुळे हे दृश्य पाहताच सर्वजण थक्क झाले आणि कोणी आपल्या डोळ्यांनी तर कोणी आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करू लागला.
दुबईच्या मॉल्समध्ये फ्लाइंग कॅमल्स शो अनेकदा दाखवला जातो. मार्केटिंग इव्हेंट्स असो किंवा टेक प्रदर्शन, प्रत्येक इव्हेंटमध्ये असे शो प्रोजेक्ट केले जातात. अशा स्थितीत दुबईच्या मॉल्समध्ये किंवा इतर ठिकाणच्या फ्लाइंग कॅमल्सच्या शोमध्ये उंट हे वास्तवात उडत असल्यासारखे दाखवले जातात. पण प्रत्यक्षात असे घडत नाही, हा केवळ तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. जे हाय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. होलोग्राम किंवा प्रोजेक्शन मॅपिंगच्या मदतीने उंट हवेत उडताना दाखवले जातात.
युजर्स मात्र हा चमत्कार पाहून आता थक्क झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @globe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे काय आहे, का त्या बिचाऱ्या उंटाला त्रास देत आहात”.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट! महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनी नैराश्येत; महाविद्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी अन्…
गुरु रंधावा रुग्णालयात दाखल; गंभीर जखमी