महाराष्ट्रात (mh)दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बुलढाण्यात प्रतापराव(mh) जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत होतेय. या मतदारसंघात बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत….
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीत तिरंगी लढत होतेय. विद्यमान भाजप खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत.
परभणीमध्ये मविआचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख उभे आहेत..
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत होतेय.
नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. इथे भाजपसोबतच अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होतेय…
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत आहे…
या आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावलाय. आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे..
हेही वाचा :
झवेरी बाजारातील सोने तस्करीचा डीआरआयने केला पर्दाफाश
पंतचा गुजरातला तडाखा! होमग्राउंडवर 4 धावांनी विजय
बर्फाने केले डोके गरम; अस्वच्छतेमुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी वाढली