कॅन्सर, हृदयरोग, डायबेटीस रुग्णांवरील (Cancer)उपचार सहजसोपे व्हावेत, यासाठी गोरखपूर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक डॉ. तुलिका मिश्रा यांनी एक अनोखे उपकरण तयार केले आहे. ‘बायोसेन्सिंग’ असे या उपकरणाचे नाव आहे. या संशोधनाला नुकतेच ब्रिटनचे पेटंट मिळाले आहे.
डॉ. तुलिका मिश्रा या दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठात वनस्पती विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक आहेत. सध्याच्या काळात लोकांची जीवनशैली बदलली आहे. (Cancer)त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. कॅन्सर, हदयरोग, मधुमेह याचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवरील उपचारात उपयोगी पडेल, असे उपकरण डॉ. तुलिका मिश्रा यांनी तयार केलेय. रुग्णांना कोणती औषधे द्यायची आणि कधी द्यायची, हे ठरवण्याची क्षमता या अनोख्या उपकरणात असेल. तसेच हृदयरोगाशी संबंधित आजारांची माहितीही सहजरीत्या मिळेल. डॉ. तुलिका मिश्रा यांच्या संशोधनावर ब्रिटनेही पेटंट देऊन मोहोर उमटवली आहे.
मागील पाच वर्षांपासून डॉ. तुलिका मिश्रा यांनी विविध राज्यांतील नऊ संशोधकांसमवेत मोबाईल सेन्सिंग डिव्हाईसवर काम सुरू केले होते. वेगवेगळय़ा आजारांसाठी औषधीय वनस्पतींवर प्रयोग करत हे अनोखे उपकरण डिझाईन करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. या यशानंतर त्यांनी 2021 मध्ये या उपकरणाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला. आता डॉ. तुलिका मिश्रा यांच्या ‘बायोसेन्सिंग’ उपकरणाला पेटंट मिळाले आहे. ‘पर्सनलाइज्ड मेडिसीन अॅण्ड फार्मोकोथेरपी’च्या सिद्धांतावर हे उपकरण डिझाईन करण्यात आले आहे.
‘बायोसेन्सिंग’ उपकरण हाताळणे एकदम सोपे असल्याचे डॉ. तुलिका मिश्रा यांनी सांगितले. उपकरणाला ब्ल्यू टुथ किंवा वायफायने कनेक्ट करून रुग्णाच्या शरीरात बायोसेन्सिंग केले जाते. याचे परिणाम स्क्रीनवर दिसतात. त्यामुळे रुग्णाला कोणते औषधे द्यायचे, हेदेखील ठरवता येईल. या उपकरणामुळे माणसाच्या शरीरातील एन्झाइम, हार्मोन्स आणि प्रोटीन यांचीदेखील माहिती मिळू शकते.
हेही वाचा :
आभाळमाया – तेरावा चांद्रवीर जपानी!
शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा विजय, अवघ्या ४ धावांनी गुजरातचा पराभव…