नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण, दही हा आपल्या आहाराचा असा भाग आहे(curd)ज्याशिवाय अनेकांना त्यांचे जेवण अपूर्ण वाटते. प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले हे सुपरफूड आरोग्यासाठी वरदान मानले जाते, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही दररोज खात असलेले दही तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे का?तुम्ही कधी विचार केला आहे का की ते दररोज खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते का? चला तर मग आजच्या या लेखात आपण दह्याशी संबंधीत अशी 5 तथ्ये जाणून घेऊयात जे दह्याबद्दलचा तुमचा सर्व सभ्रंम दूर करतील आणि तुमच्या आरोग्यासाठी कधी, कसे आणि किती प्रमाणात दही योग्य आहे हे देखील जाणून घेऊयात.

हो, जर तुम्हाला वाटत असेल की दही नेहमीच वजन कमी करण्यास मदत करते, तर हे पूर्णपणे खरे नाही. पॅक बंद असलेल्या आणि फ्लेवर्ड दह्यामध्ये अनेकदा साखर आणि फॅट भरपूर असते, ज्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन वाढू शकते. यासाठी तुम्ही घरी तयार केलेले साधे घरगुती दही सेवन सर्वोत्तम आहे.रात्री दही खाल्ल्याने कफाचा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे सर्दी, घसा खवखवणे किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. (curd)जर तुम्हाला दहीचे सेवन करायचे असल्यास दिवसा दही खाणे चांगले.

दह्यामध्ये लैक्टोज असते. ज्या लोकांना लैक्टोज असहिष्णुता आहे त्यांना दही खाल्ल्याने पोटफुगी, गॅस किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांनी दही सावधगिरीने खावे किंवा लैक्टोज-मुक्त दही निवडावे.जास्त आंबट किंवा जास्त दिवसाचे दही खाल्ल्याने पोटात आम्लपित्ताची आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला आम्लपित्ताच्या समस्या टाळायचे असेल तर नेहमी ताजे आणि योग्यरित्या सेट केलेले दही खा.तुम्ही कोणत्या आजारावर औषध घेत असाल तर तेव्हा दहीचे सेवन केल्याने तुम्हाला ॲलर्जी होण्याची शक्यता असते(curd). किंवा औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. . जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर दररोज दही सेवन करावे की नाही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष