देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. (celebration)21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान. देशात लोकशाहीचा उत्सव सुरु होत असून, त्यासाठी संपूर्ण भारत देश सध्या सज्ज झाला आहे. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. (celebration)गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.
चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत असून, प्रचारसभांमध्ये या दोन्ही नेत्यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला होता. इथं निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असून, यंदा 2019 च्या तुलनेत इथं 65 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
सरसंघचालकांनी भाऊजी दप्तरी शाळेतील मतदानकेंद्रात जात बजावला मतदानाचा हक्क, मतदानाचा हक्क बजावून तुम्ही एका प्रकारे पाच वर्षांसाठी देशाचं भविष्य निर्धारित करता आणि त्यामुळं सर्वांनीच मतदान करावं. यासाठी मीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलं.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक प्रभारी आणि स्वयंसेवक मतदान केंद्रावर पोहोचले असून, मतदान प्रक्रिया सुरु होण्याआधीपासून मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले.
हेही वाचा :
कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!
CSK ला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाला होणार महाविकास आघाडीचा महामेळावा !