इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण(education) विभागाने आज, बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केले. कोल्हापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी २२ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी १.०० ते सायं. ५.२० या वेळेत पाच वेगवेगळ्या केंद्रांवर एकाच वेळी ही परिषद पार पडली. यामध्ये सायन्स कॉलेज ऑफ इचलकरंजी (वायसीपी कॉलेज मागे, सहकारनगर), आदर्श विद्यामंदिर, मुक्त सैनिक वसाहत, इचलकरंजी, माई बाल विद्यामंदिर, इचलकरंजी, लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश स्कूल, शहापूर, इचलकरंजी आणि शाळा क्र.५२, विक्रम नगर, इचलकरंजी (केवळ उर्दू विभागासाठी) या केंद्रांचा समावेश होता. या परिषदेत प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक, माध्यमिक शाळांमधील ५ वी ते ८ वीला शिकवणारे किमान चार शिक्षक, तसेच स्वयं-अर्थसाहाय्यित शाळांमधील दोन शिक्षकांना सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले होते.व एकूण ६०० शिक्षक हजर होते.
या परिषदेत परख राष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल आणि पीजीआय (PGI) संदर्भात महाराष्ट्र व कोल्हापूरची सद्यस्थिती, मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणासंदर्भातील दिशा आणि उपक्रम, इयत्ता १ ली व २ री साठी नवीन अभ्यासक्रमानुसार विषय योजना व शालेय वेळापत्रकाचे नियोजन, तसेच ‘आयडॉल शिक्षक’ निवड प्रक्रिया, शैक्षणिक संस्था-३, तसेच ‘शाळा बँक’ तयार करण्याबाबत मार्गदर्शन या महत्त्वाच्या शैक्षणिक(education) विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. होसकोटे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री बी. एम. कासार, प्रशासनाधिकारी श्री इरफान पटेल आणि पर्यवेक्षक श्री राजेंद्र धोडके यांनी सर्व केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मा. सौ. पालवी पाटील आणि उपायुक्त (शिक्षण) श्री अशोक कुंभार यांच्या विशेष मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळेच ही परिषद यशस्वी झाली, असे सांगण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास प्रत्येक केंद्रप्रमुख आणि प्रमुख शिक्षकांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार ३००० रुपये? जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन