विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. ‘छावा'(released)चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे विकीच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.

‘छावा” बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12
‘छावा’ पहिला दिवस 33.1 ‘(released)कोटी रुपये
दुसरा दिवस – 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस – 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस – 24 कोटी रुपये
पाचवा दिवस – 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस – 32 कोटी रुपये
सातवा दिवस – 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस – 23 कोटी रुपये
नववा दिवस – 45 कोटी रुपये
दहावा दिवस – 40 कोटी रुपये
अकरावा दिवस – 19.10 कोटी रुपये
बारावा दिवस – 17 कोटी रुपये
एकूण कमाई – 365.25 कोटी रुपये
‘छावा’ चित्रपटाने कमाईमध्ये ‘बाहुबली 2’, ‘पुष्पा ‘(released)2’ या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात ‘छावा’ चित्रपटाने 444.5 कोटी रुपये कमावले आहेत. ‘छावा’ ने दुसऱ्या मंगळवारच्या कमाईत ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडला आहे. आता पहिल्या नंबरवर ‘पुष्पा 2’तर दुसऱ्या नंबरवर ‘छावा’ आहे. आता लवकरच ‘छावा’ ‘पुष्पा 2’ रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. ‘छावा’ चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे. तर महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे. ‘छावा’ चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील पाहायला मिळत आहे. ‘रायाजी’ च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर झळकला आहे.
हेही वाचा :
प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral
सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;
माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट