‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड, शिंदे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही’, संजय राऊतांचा टोला

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला(politics) एकही जागा मिळणार नाहीत, तसेच महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजयी होईल, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी याबाबत महत्वाचे विधान केले.

“जी शिवसेना मोदी, शहांच्या(politics) मदतीने चोरली. त्याच्या मागे लोकांनी का उभे राहावे? एकनाथ शिंदेंकडे डॅमेज कंट्रोल करायला काहीच शिल्लक नाही. महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैश्यांच्या थैल्या वाटू द्या, खोटे गुन्हे टाकू द्या, मात्र लोक त्यांना मतदान देणार नाहीत.” असा दावा संजय राऊत यांनी केला.

तसेच “नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात ठाण मांडले आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान ३५ जागा जिंकेल. तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते तन मन लावून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे, मात्र त्यांची अखेरची फडफड सुरू आहे,” असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

‘१५ तारखेला नाशिक महापालिकेच्या ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा खुलासा करणार आहे. यामध्ये कोण सहभागी आहे, लाभार्थी आहे, हे जनतेसमोर उघड करावे लागेल. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना हे पैसे मिळालेत. बिल्डर अचानक कसे शेतकरी झाले? त्यांना कसे पैसे मिळाले?’ असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा :

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी महाविकास आघाडीची अतिभव्य सभा

भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न, त्यांना केवळ मीच दिसतोय; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप