‘स्त्री-२’च्या कोरियोग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार सरकारने घेतला परत, बलात्काराच्या आरोपात…

साउथपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या नृत्याची छाप सोडणारा नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जानी मास्टर 19 सप्टेंबरपासून बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. जानी मास्टर यांनी अनेक सिनेमांत त्यांच्या नृत्याअविष्कार दाखवला आहे. त्याच्या याच कलेसाठी त्याला चित्रपट थिरुचित्राम्बलम मधील मेघम करुक्कथा या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार(Award) मिळणार होता. मात्र आता भारत सरकारने हा पुरस्कार परत घेण्याची घोषणा केली आहे.

मास्टर जानीवर पॉक्साअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार(Award) सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्याला जामीनदेखील देण्यात आला होता. मात्र आता भारत सरकारने त्याचा पुरस्कार आणि निमंत्रण परत घेतलं आहे. सरकारने त्याच्यावर करण्यात आलेल्या गुन्ह्याची गंभीरता पाहून हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, आता जानी मास्टरला या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नसणार आहे. शुक्रवारी सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार विभागाने एक पत्रक हे जारी केले आहे.

पत्रकात म्हटलं आहे की, जानी मास्टरचा राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्यात येत आहे. इंद्राणी बोस यांनी पत्रात नमूद केलं आहे की, आरोपांचे गांभीर्य आणि कोर्टातीच प्रकरण यामुळं श्री शेख जानी यांचा 2022 साठी बेस्ट कोरियाग्राफीचा राष्ट्रीय पुरस्कार निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जानी मास्टरने दिल्लीत 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यासाठी जामिन मिळाला होता. मात्र आता आमंत्रणाबरोबरच पुरस्कारही परत घेण्यात आला आहे.

जानी मास्टर याला 19 सप्टेंबर रोजी गोव्यातून अटक करण्यात आली आहे. गोव्यातून त्याला हैदराबाद येथे घेऊन आले. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जानी मास्टरवर POCSO चा गंभीर आरोप लावण्यात आले आहे. त्याच्याच एका महिला असिस्टेंटने कोरियोग्राफरने दावा केला होता की 2020 मध्ये मुंबईत जानी मास्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसंच, तिला धमकी देण्यात आली की कोणालाही याबाबत सांगायचं नाही.

हेही वाचा:

कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र

भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी Video Viral

सांगलीत लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन पीडितेवर 3 अज्ञातांकडून कटरच्या सहाय्याने वार अन्…

सांगली : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत