पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी(Clash) आले होते. यादरम्यान खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवडे या दोघांच्या वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/07/image-59-1024x819.png)
यावरुन दोन्ही वाहनचालकांकडून (Clash)आधी एकमेकांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर बेल्टने फ्री स्टाईल हाणामारी करण्यात आली असून हे प्रकरण एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत वाढलं. शिवाय सदर प्रकार हा हसन मुश्रीफ यांच्या समोरच घडला आहे.
हसन मुश्रीफ हे पूरग्रस्त भागामध्ये पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी हा वाद झाला. त्यानंतर मुश्रीफांच्या ड्रायव्हरने या दोघांमध्ये मध्यस्ती केली. पण पुरग्रस्त पाहणीवेळी खासदार आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरमध्ये झालेल्या या वादाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :
आरक्षण मर्यादा उठवा मागणी मान्य होईल?
कोल्हापूर जिल्ह्यात 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद
उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश