मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; गजानन राणेंसह इतर २० साथीदारांवर गुन्हा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील अंतर्गत वाद(clash) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मनसे कामगार नेते गजानन राणे यांच्या कार्यकर्त्यांची आणि मनसे पदाधिकाऱ्यांची भररस्त्यात बेदम हाणामारी झाली आहे. या घटनेत काही कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. अगदी रक्तबंबाळ होइपर्यंत मारहाण झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल रात्री(clash) उशिरा चांदीवली परिसरात हा वाद झाला. मात्र यावरून मनसेचा अंतर्गत वाद समोर आल्याचं पाहायला मिळतंय. झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना घडली तेव्हा कामगार नेते गजानन राणे तिथे उपस्थित होते. मारहाण करणारे कार्यकर्ते हे गजानन राणे यांचे असल्याचं सांगण्यात येतं.

घटनेनंतर या प्रकरणी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हाणामारी झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये.

स्थानिक मनसे पदाधिकारी गजानन राणे आणि मारहाण झालेली व्यक्ती यांच्यात आधीपासून जुना वाद होता. हाच वाद मिटवण्याकरता काल गजानन राणे त्यांच्या काही साथीदारांसह त्यांना भेटण्याकरता गेले. बातचीत सुरू असताना त्यांच्यात आधी वाद झाला पुढे हा वाद टोकाला गेला आणि गजानन राणे यांच्या साथीदारांनी सदर व्यक्तीस बेदम मारहाण केली.

दरम्यान या घटनेनंतर साकीनाका पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. गजानन राणे आणि त्यांच्या इतर 20 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलिसांनी अटकेची कारवाई देखील सुरू केली आहे.

हेही वाचा :

काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! 42 वर्षांनी विजयी एन्ट्री

तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी

भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..