टाटा ग्रुपची ‘ही’ कंपनी देणार तगडे रिटर्न्स, शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केल्यास होणार भरपूर फायदा!

सध्या शेअर बाजारात(share market) मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सध्याची स्थिती पाहता गुंतवणूकदार वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्यातरी शेअर बाजारात(share market) गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मक स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सूचवले आहेत. Tejas Networks आमि Apollo Micro Systems अशी या दोन शेअर्सची नावे आहेत.

विकास सेठी यांच्या म्हणण्यानुसार टाटा ग्रुपची टेलिकॉम Tejas Networks ही कंपनी आगामी काळात तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. सध्या या शेअर्सचे मूल्य 1,275 रुपये आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 1240 रुपयांचा स्टॉपलॉस तसेच 1325 रुपयांचे शॉर्ट टर्म टार्गेट ठेवायला हवे. ही कंपनी टेलिकॉम कंपन्यांसाठी वेगवेगळी उपकरणं पुरवते. ही कंपनी TCS या कंपनीसोबत 15000 कोटी रुपयांच्या प्रकल्पावर काम करत आहे. .

विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म साठी अपोलो मायक्रो सिस्टिम्स या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर चांगलाच तेजीत दिसत आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 107.75 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 100 रुपयांचा स्टॉपलॉस तसेच 115 रुपयांचे टार्गेट निश्चित करायला हवे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं तयार करते.

ही कंपनी प्रामुख्याने एयरोस्पेस, डिफेन्स आणि एव्हियोनिक्स क्षेत्रात काम करतो. DRDO, इंडियन आर्मी हे अपोलो मायक्रो सिस्टिम्सचे ग्राहक आहेत. ही कंपनी हैदराबादमध्ये नवा मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट तयार करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला पाठिंबा देत आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.

(टीप– शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा:

नेते तुपाशी, कार्यकर्ते उपाशी! सोयीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या पोटावर पाय

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यास केंद्रातील मोदी सरकारही पडणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान

आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर…