काँग्रेस आमदार आणि माजी कुस्तीपटू विनेश फोगाटला पुत्ररत्न, चाहत्यांकडून अभिनंदन

ऑलिम्पिक पदक विजेता माजी कुस्तीपटू आणि काँग्रेस (congratulate) आमदार विनेश फोगाट यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. विनेश फोगाटने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. विनेशला सोमवारी 30 जून रोजी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी विनेशने 1 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. विनेशने 6 मार्च 2025 रोजी सोशल मीडियावरुन त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती दिली होती. विनेशने तेव्हा पती सोमवीर राठीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. तेव्हा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विनेश फोगटची प्रसूती ऑपरेशनद्वारे झाली. विनेश आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. दोघेही ठणठणीत आहेत”, अशी माहिती विनेशचे सासरे राजपाल राठी यांनी दिली. विनेश आणि सोमवीर 14 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकले होते. विशेष बाब म्हणजे सोमवीर याने देखील कुस्तीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विनेश आणि सोमवारी या दोघांची पहिली भेट 2011 साली झाली होती. दोघेही भारतीय रेल्वेलासाठी काम करायचे. (congratulate) या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. सोमवीरने विनेशला 2018 साली विमानतळावर लग्नाची मागाणी घातली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

सात नाही तर 8 फेरे
विवाहसंस्थेनुसार, लग्नात 7 फेरे घेतले जातात. मात्र विनेश आणि सोमवीर या दोघांचं लग्न हे याला अपवाद ठरलं.या दोघांनी लग्नात 7 ऐवजी 8 फेरे घेतले होते. या दोघांनी आठवा फेरा हा समाजात मुलींबाबत जागृकता निर्माण व्हावी यासाठी घेतला होता. या दोघांनी या आठव्या फेऱ्याद्वारे बेटी बचाओ,(congratulate) बेटी पढाओ, बेटी खिलाओ हा संदेश दिला होता. त्यामुळे या दोघांच्या विवाहाची चांगलीच चर्चा झाली होती.

दरम्यान विनेशला 2024 हे वर्ष कधीच विसरता येणार नाही. विनेशने 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक निश्चिक केलं होतं. तर विनेशला सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी होती. मात्र अंतिम सामन्याआधी विनेशचं मर्यादेपेक्षा काही ग्रॅम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला रौप्य पदकही मिळालं नाही. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक समितीने क्रीडा न्यायालयाचे दार ठोठावले. विनेशच्या रौप्य पदकासाठी न्यायलयीन लढा देण्यात आला. मात्र विनेशला पदक मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विनेशला मायदेशी रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र विनेशचं भारतात परतल्यानंतर अनेक संघटनांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.

विनेशने त्यानंतर कुस्तीला कायमचा रामराम करत निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. विनेशने कुस्तीचा आखाडा सोडत राजकारणाच्या मैदानात उतरणयाचा निर्णय घेतला. विनेशने त्यानुसार काँग्रेसचा हात धरला. विनेशने हरयाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. विनेशने पहिल्याच झटक्यात विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार म्हणून निवडून आली. त्यानंतर आता विनेश आई झाली आहे. विनेशला पुत्ररत्न प्राप्त झाल्यानतंर सोशल मीडियावर तिचं अभिनंदन केलं जात आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..