तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे अल्पमतात आलेले हरयाणातील भाजपचे नायबसिंग सैनी सरकार(govt) पाडण्यासाठी काँग्रेसने शेवटचा दे धक्का द्यावा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार असल्याचे जननायक जनता पक्षाने म्हटले आहे.
अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतरही आपले सरकार (govt)कोणत्याही अडचणीत नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांची बहुमतासाठी कमी पडणाऱया दोन सदस्यांसाठी जेजेपीतील काही आमदारांवर कालपर्यंत मदार होती. मात्र आज जेजेपीनेच असे वक्तव्य केल्यानंतर सैनी कावरेबावरे झाले होते. याच जेजेपीला मार्चमध्ये राज्य सरकारमधून भाजपने बाहेरचा रस्ता दाखवत युती तोडली होती. आता जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला जुना हिशेब चुकता करण्यासाठी सरसावले आहेत. जेजेपी आता भाजपसोबत जाणार नाही असे सांगत, सैनी यांनी एकतर बहुमत सिद्ध करावे किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
घडामोडींना वेग
अपक्ष आमदारांपाठोपाठ जेजेपीनेही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात लोकसभेसाठी अवघ्या पंधरवडय़ाने मतदान होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले चौटाला…
विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंग हुडा यांनी सैनी सरकार पाडण्यासाठी आता पावले उचलावीत, अधिक वाट पाहू नये. जर सैनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला तर आम्ही सरकारच्या विरोधात मतदान करू, असे हिसारमध्ये पत्रकारांशी बोलताना जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी सांगितले. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता सैनी सरकार अल्पमतात असताना निवडणुकीदरम्यान हे सरकार पाडले जाईल. असे पाऊल उचलले गेले तर आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा पूर्ण विचार करू असे हुडा यांना आम्ही सांगू इच्छितो, असे चौटाला म्हणाले.
हेही वाचा :
कोल्हापुरात मृतदेहाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी
काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! 42 वर्षांनी विजयी एन्ट्री
तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी