शभरात वाहत असलेल्या विरोधी लाटेमुळे धास्तावलेल्या पंतप्रधान(pm) नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाईत पुन्हा एकदा काँग्रेस तुमचे आरक्षण काढून घेणार आणि ते मुस्लिमांना देणार असल्याचे कॉपीपेस्ट भाषण केले.
मुंबईवर हल्ला करणाऱया अतिरेक्यांबद्दल काँग्रेसला उमाळा आला असून या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा काँग्रेस अपमान करत असल्याचा आरोपही मोदींनी केला. महाराष्ट्रातील दुष्काळाला काँग्रेस जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.(pm)
बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत जाहीर सभा झाली. या सभेत मोदींनी चारशेपार, गॅरंटीबद्दल चकार शब्दही काढला नाही. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 पुन्हा आणले जाईल, नागरिकत्व कायदा रद्द करण्यात येईल, तीन तलाक कायदाही बासनात गुंडाळून ठेवण्यात येईल, किसान सन्मान योजना, मोफत धान्य योजना, वैद्यकीय उपचार आदी योजनाही गुंडाळल्या जातील. एवढेच काय काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालही काँग्रेसवाले पलटणार आहेत. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस प्रभू श्रीराम आणि रामभक्तांचा पदोपदी अपमान करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा :
मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!
टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट अन् रोहित करणार ओपन; निवडसमिती अन् बीसीसीआनेही…
महाडिक अन् मंडलिकांना ‘ती’ वक्तव्य भोवणार? महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार