सर्दी खोकला झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या(ayurvedic) औषध आणून खातात. मात्र गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी, खोकला आणि कफच्या समस्येपासून आराम मिळतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आजारपण वाढू लागतात. डेंग्यू, मलेरिया किंवा इतर साथीच्या(ayurvedic) आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील हातगाडी किंवा इतर जंक फूडचे सेवन करू नये. कारण दूषित पाणी किंवा कुजलेल्या भाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्या किंवा इतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो घरी बनवलेल्या हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सर्दी, खोकला होतो. सर्दी खोकला झाल्यानंतर नाक गळणे किंवा खोकल्यामुळे घशातून रक्त येण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोणत्या घरगुती काढ्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी काढ्याचे(ayurvedic) सेवन केल्यास सर्दी कमी होईल. तसेच घशात वाढलेली खवखव कमी होऊन कफ मोकळा होईल. सर्दी खोकला झाल्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करतात.
आयुर्वेदिक काढा बनवण्याची कृती:
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. काढा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा, चिमूटभर काळी मिरी पावडर, एक चमचा किसलेले आले आणि चमचाभर मध इत्यादी पदार्थ लागणार आहेत. टोपात पाणी गरम करून त्यात ओवा, काळीमिरी पावडर, किसून घेतलेलं आलं टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेले पाणी घालून त्यात चमचाभर मध टाकून मिक्स करा आणि सेवन करावे. तयार केलेला काढा दिवसभरात दोनदा किंवा तीनदा प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
ओव्याचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित सर्वच समस्या दूर होतात. तसेच ओव्यांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म शरीरातील घाण स्वच्छ करून सर्दी आणि कफपासून सुटका मिळवून देतात. ओव्याच्या पाण्याची वाफ घेतल्यास कफ पातळ होतो. घसा खवखवणे आणि घशाला आलेली सूज कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी किंवा काढ्याचे सेवन करावे. ओवा, मध आणि गरम पाणी एकत्र करुन नियमित प्यायल्यास सर्दी खोकला कमी होतो आणि शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.फुफ्फुसांमधील घाण मुळांपासून होईल नष्ट! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, छातीत सुकलेला कफ होईल कमी
सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे आजार, आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.उकळून थंड केलेले पाणी प्या. ताजी फळे आणि भाज्या खा.बाहेरचे मसालेदार आणि तेलकट पदार्थ, तसेच शिळे अन्न टाळा.
हेही वाचा :
शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!