रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. (levels)म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर कधीच वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

जगभरात गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव, गोड पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक(levels) गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जीवनशैलीतील बदलांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजार वाढू लागले आहेत. हल्ली प्रत्येक व्यक्ती मधुमेहाने त्रस्त आहे. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मधुमेह आणखीनच वाढू लागतो, ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील अवयव हळूहळू निकामी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तात साखर वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

जांभूळ:
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभूळ उपलब्ध आहेत. जांभुळमध्ये जंबोलिन आणि जंबोसिन नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखर अजिबात वाढत(levels) नाही. इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधार करण्यासाठी नियमित जांभूळ खावे. जांभूळ किंवा जांभळाच्या पावडरचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. जांभळातील अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती कायमच मजबूत ठेवतात.

पेरू:
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पेरू खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पेरू खाल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी पेरू अतिशय गुणकारी आहे.
पपई:
पपई खाल्यामुळे आरोग्याला भरपूर पोषण मिळते. महिलांच्या आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी ठेवतात. मधुमेहाच्या रुग्णांनी कमी कॅलरीज असलेल्या फळांचे सेवन करावे. पपईचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आलेली सूज कमी होते.
हेही वाचा :
श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर
फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक
आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा