इथे गुन्हे “अंगावर” घेतले जातात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पुणे येथील कल्याणी नगर भागात घडलेल्या पोर्शै कार(body) अपघातात गुन्हा अंगावर घेण्यासाठी गंगाधर नामक ड्रायव्हर वर दबाव टाकल्याच्या, त्याला बंगल्यात कोंडून ठेवल्याच्या आरोपावरून सुरेंद्रकुमार अग्रवाल यास पोलिसांनी अटक केली आहे. फेटल अपघात मध्ये ड्रायव्हर बदलण्याचे, अपघातग्रस्त वाहन बदलण्याचे प्रकार घडत नाहीत असे नाही. कोणाची तक्रार नसल्याने हे प्रकार उघडकीस येत नाहीत इतकेच.

अग्रवाल कुटुंबातील दिवट्या अल्पवयीन मुलाने निष्पाप तरुण आणि तरुणीला आलिशान(body) कारखाली चिरडल्यानंतर त्यास जमावाने चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले नसते तर या भीषण अपघातात दुसऱ्याच व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून पुढे आणले गेले असते. आणि मग हे हिट अँड रन प्रकरण देशभर गाजलेच नसते.

रस्ते कार अपघातात चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसला तर परवाना असलेल्या दुसऱ्याच चालकाला पोलिसात हजर केले जाते. अपघात करणारा वेगळाच असल्याचे तपास करणाऱ्या माहीत असते पण टेबलाखालून झालेल्या आर्थिक व्यवहारातून हे अधून मधून घडत असते. अनेकदा अपघातग्रस्त वाहनाचा थर्ड पार्टी किंवा संपूर्ण विमा उतरवण्यात आलेला नसतो किंवा परराज्यात वाहन फिरवण्याचा परवाना नसतो अशा वाहनाखाली चिरडून मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना अपघात नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येतात. मग अपघात करणाऱ्याला वाचवणे आणि वारसांना विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून वाहन चालकासह वाहन बदलले जाते.

ज्या वाहनाचा संपूर्ण विमा आहे, ऑल इंडिया परमिट आहे, वाहन चालकाकडे वाहन चालवण्याचा रीतसर परवाना आहे असा चालक व वाहन अदलाबदलीचा व्यवहार केला जातो. असा गुन्हा अंगावर(body) घेण्यासाठी संबंधिताला आर्थिक मोबदला दिला जातो आणि त्याला या गुन्ह्यातून दोष मुक्त करण्याची जबाबदारीही घेतली जाते. हा व्यवहार मृताच्या नातेवाईकांनाही माहीत असतो. अपघात नुकसान भरपाई मिळते म्हणून नातेवाईक या अदलाबदलीला मान्यता देत असतात.

आपल्या मालकाचा मुलगा भरपूर दारू प्यायला आहे, तो मद्य धुंद आहे, हे माहीत असूनही पोर्शै कारच्या ड्रायव्हरने त्या दिवट्याला कार चालवण्यास दिली हा त्याचाही गुन्हा आहे, पण राज्यात आणि देशात गाजत असलेल्या या हिट अँड रन गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी महत्त्वाचा साक्षीदार असला पाहिजे म्हणून त्यास वेगळा न्याय देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न दिसतो. जमावाने चोप देऊन त्यात दिवट्या अग्रवालला पोलिसांत हजर केले नसते तर हा अपघाताचा गुन्हा अंगावर घ्यायला अनेक जण पुढे आले असते. कारण अग्रवाल कुटुंब धन दांडगे आहे. या अपघात प्रकरणातून अग्रवाल कुटुंबीयांची गुन्हे प्रवृत्ती ही समाजासमोर आली आहे.

कोणत्याही शहरात किंवा गावात गावठी हातभट्टीचे अड्डे असतात. अशा अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले पाहिजेत म्हणून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून उद्दिष्ट दिले जाते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर वारंवार धाडी टाकल्या जातात. पण या धाडीमध्ये अंड्याचा मालक कधीही सापडत नाही. तर अड्ड्याच्या मालकाकडून पोलिसांकडे दुसराच संशयीत आरोपी सोपवला जातो. त्याला” बकरं”असं म्हटलं जातं.

या बकऱ्यावर हातभट्टी दारूची विक्री केल्याचा गुन्हा दाखल केला जातो. अर्थात हा गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे त्याची तासाभरात पोलीस ठाण्यातूनच सुटका केली जाते. दारूचा अड्डा चालवण्याचे गुन्हे अशा प्रकारे अंगावर घेतले जातात. त्याबद्दल संबंधिताला एका गुन्ह्यासाठी ठराविक रक्कम दिली जाते. गुन्हा एकाने करायचा आणि तो दुसऱ्याने अंगावर घ्यायचा, असे प्रकार इतर ठिकाणीही घडत असतात.

हेही वाचा :

दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?

‘अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे’, ठाकरे गटाचा हल्लाबोल

मॅच जिंकल्यानंतर शाहरुख झाला भावूक ; वडिलांच्या मिठीत लेक रडली