कच्च्या तेलाच्या दरात घसरण, शहरात पेट्रोल ९८.१० रुपये झाले तुमच्या शहरातील दर किती?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. (petrol and diesel) अशातच आंतरराष्ट्रीय बाजारातून काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण झाली असून, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याच्या अपेक्षेमुळे जागतिक बाजारातील तेलाच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सलग काही दिवसांपासून दबावाखाली आहेत. कच्च्या तेलाच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली गेली असून, ब्रेंट क्रूडच्या किमतीतही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि तेल कंपन्यांच्या निर्णयानुसार देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर तुलनेने स्थिर आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर, मुंबईत १११.१८ रुपये, कोलकात्यात ११३.४७ रुपये आणि चेन्नईमध्ये १०७.७७ रुपये प्रति लिटर आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल ११०.९३ रुपये, हैदराबादमध्ये ११५.६९ रुपये, जयपूरमध्ये ११२.६६ रुपये, पाटण्यात ११३.३५ रुपये, तर तिरुअनंतपुरममध्ये ११५.४९ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. (petrol and diesel) दरम्यान, चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर ९८.१० रुपये प्रति लिटर असून गुरुग्राममध्ये १०२.७७ रुपये आणि नोएडामध्ये १०२.१२ रुपये प्रति लिटर दर आहे. भुवनेश्वरमध्ये पेट्रोल १०९.९२ रुपये, लखनौमध्ये १०२.०५ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचा डॉलरच्या तुलनेतील दर आणि केंद्र तसेच राज्य सरकारांचे कर यांचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होतो. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी त्याचा परिणाम लगेच पेट्रोल-डिझेलच्या पंपावरील किमतींवर दिसेलच असं नाही. इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. (petrol and diesel) त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. काही काळ कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढेही गेला होता. या वाढीचा परिणाम अनेक देशांच्या इंधन दरांवर झाला. आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरत असल्याने वाहनधारकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?