अर्जुनचा तो व्हिडिओ दाखवून दामिनीकडून पत्रकारांची दिशाभूल, सायलीचा कडक नवस, जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर….

ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जुलैच्या एपिसोडमध्ये कोर्टात सगळे आपल्या (episode)बाजूने घडून सुद्धा सायलीला रात्री फार अस्वस्थ वाटत असतं. सकाळी सुद्धा तिचं अस्वस्थतेमुळे कामात लक्ष लागत नसतं. तेव्हा अर्जुन तिला बरं वाटावं म्हणून मंदिरात घेऊन जातो.

दुसरीकडे अर्जुनचा आत्मविश्वास ढासळण्यासाठी एडव्होकेट दामिनी देशमुख तिरकी चाल खेळते. कोर्टामध्ये अर्जुन आपल्या डोईजड होत आहे हे दामिनीच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे ती मुद्दाम तातडीची पत्रकार परिषद बोलावून घेते. त्यावेळी ती अर्जुनवर नको नको ते आरोप करते. अर्जुन कोर्टात सतत खोटं बोलत आहे. तो केवळ आपल्या बायकोच्या वडिलांना म्हणजेच आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी हे सगळं करतोय. त्यामुळे (episode)एका बिचाऱ्या मुलीला नाहक त्रास सहन करावा लागतो असं ती बोलते.

हे सर्व होत असताना साक्षी पत्रकारांसमोर मगरीचे अश्रू गाळत असते. तर महिपत सुद्धा आपण किती बिचारे आहोत हे दाखवत असतो. अर्जुनवर चिखल फेक करण्यासाठी दामिनी एक व्हिडिओ पत्रकारांना दाखवते. ज्यामध्ये त्याने कोर्टात जोशी वकिलांना मारहाण केलेल्याचे फुटेज असतो. ते सगळं पाहून पत्रकार सुद्धा अचंबित होतात. दामिनी पत्रकारांना बोलते हा माणूस नामांकित वकिलांना जर असं वागवत असेल तर कोर्टात किती खोटं बोलू शकतो. त्यांची खरी बाजू ही जगासमोर आली पाहिजे म्हणून मीही पत्रकार परिषद घेतली आहे.

Tharla Tar Magमध्ये सायलीने देवीला वेठीला धरलेलं असतं. (episode)ती देवीकडे साकडं घालते की जोपर्यंत या केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत मी एक वेळेच जेवण जेवणार तेही बिना मिठाचं. सायली आपल्यासाठी एवढं सगळं करते आपल्याला काही झालं तरी केस जिंकावीच लागेल हे अर्जुनने ठरवलेलं असतं. तो सायलीला बोलतो की हे असं काही करण्याची गरज नाही. तेव्हा ती बोलते की यात मी फक्त देवीला माझ्यासोबत राहण्यासाठी सांगत आहे. माझा विश्वास आहे ही केस आपण जिंकू.

Tharala Tar Mag च्या 864 व्या एपिसोडमध्ये सायली अर्जुन मंदिरात असताना दामिनीचा एक माणूस त्यांच्या आसपास असतो. ते निघत असल्याचं तो तिला सांगतो. तसेच दामिनी पत्रकार त्यांच्याही ते पाठवते. दामिनीने सांगितल्याप्रमाणे पत्रकार अर्जुन वर प्रश्नांचा भडीमार करतात. त्यामुळे तोही भांबावून जातो. जोशी वकिलांना मारहाण केल्याचा जाब ते विचारतात. साक्षी बिचारी असल्याचं बोलतात. तेव्हा सायली पाठून बोलते की केस जिंकण्यासाठी अजून आमच्याकडे १५ दिवस बाकी आहेत. आणि तुम्ही कोणाला बिचारी बोलता. जिने एका निरपराध माणसावर खूनाचा आरोप टाकला तिला.‌ अर्जुन सुद्धा बोलतो की जो माणूस अनाथ मुलांना आश्रय देतो. पैसे नसून सुद्धा स्वतःचे पैसे घालून त्यांना वाढवतील अशा साध्या म्हाताऱ्या माणसावर जिने खूनाचा आळ टाकला त्या मुलीला तुम्ही बिचारी म्हणता. तेव्हा पत्रकारांचीही बोलती बंद होते.

हेही वाचा :

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Punch CNG होईल तुमची ! किती असेल EMI?

कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १९ ते २५ जुलै २०२५ – मराठी राशी भविष्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा