चैन्नई: अचानक मृत्यूची अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. अगदी आनंदाच्या क्षणी ही मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यातील काही प्रकरणे हे खूपच धक्कादायक आहेत. तामिळनाडू येथे एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका शाळेत आयोजित कार्यक्रमात नाचताना एका व्यक्तीचा स्टेजवरच(stage) मृत्यू झाला.

तामिळनाडूच्या एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवात नृत्याच्या दरम्यान एकच गोंधळ उडाला ज्यावेळी ५३ वर्षीय व्यक्ती नाचत असताना अचानक स्टेजवर पडले. त्या व्यक्तीचे नाव हे राजेश कन्नन असल्याचे सांगितले आहे. शनिवारी संध्याकाळी राजेश कन्नन हे टीमसोबत नृत्य करत असताना ही घटना घडली.
मिडिया रिपोर्टनुसार शाळेने आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवात स्टेजवर(stage) नृत्याचे सादरीकरण सुरु होते. राजेश यांनी नाचत असलेल्या टीमसोबत काही स्टेप्स केल्या त्यानंतर काही क्षणातच स्टेजवर कोसळले. तेथील आयोजकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्यांनी स्टेजवर काही जणांसोबत नृत्य केले. तसेच व्हिडिओमध्ये स्टेजवर काही मुलेही नाचताना दिसत आहेत. नृत्य केले आणि हात जोडत ते स्टेजच्या दुसऱ्या दिशेला जात असतानाच ते अचानक कोसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शाळेतील आनंदाचे वातावरण अचानक घडलेल्या या घटनेने शोकात बुडाले आहे.
மேடையில் நடனமாடிய ஆசிரியர்.. அடுத்த நொடி கேட்ட மரண ஓலம்! சிவகங்கையில் சோக சம்பவம்!#NakkheeranKalam #NakkheeranTV #sivagangai #danceteacher pic.twitter.com/tVnqOT3iV1
— Nakkheeran (@nakkheeranweb) February 23, 2025
स्टेजवर नाचताना धक्कादायक अंतकाही दिवसांपूर्वी अशीच घटना मध्यप्रदेशातून समोर आली होती. लग्न सोहळ्यात स्टेजवर नाचताना एक मुलगी कोसळली आणि तिचा तेथेच मृत्यू झाला होता. ८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. तिच्या बहिणीच्या संगीत समारंभात ती मुलगी नृत्य करत होती.
त्या मुलीचे नाव परिणिती जैन होते ती इंदूरची रहिवासी होती. त्यानंतर एक अजून घटना तेलंगणा राज्यातून समोर आली होती. ज्यात अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या निरोप संमारंभाच्या कार्यक्रमात नृत्य करताना तिचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात समोर येत आहेत.
हेही वाचा :
1 मार्च ‘या’ 5 राशींसाठी ठरणार वरदान! नोकरीत पगारवाढ, धनवैभव, आणि संपत्तीचे वरदान मिळेल
आता एकाच वेळी दोन पदव्या मिळवा; विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
दोन भावांच्या भांडणात धाकटा भाऊ पडला विहिरीत; छातीला मार लागला अन्…