डॅशिंग IPS ऑफिसर अंजली विश्वकर्मा! ४८ लाखांची नोकरी सोडली, दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

स्पर्धा परीक्षा पास करणे खूप कठीण असते. सिव्हिल परीक्षा देऊन आयएएस,(people) आयपीएस होण्याचे स्वप्न अनेकांचे असते. फक्त प्रयत्नांनी हे यश मिळते. असंच काहीसं आयपीएस अंजलि विश्वकर्मा यांच्यासोबत झालं. त्या डॅशिंग आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांच्या कामाचे नेहमी कौतुक होत असते.

च्या मदतीने अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात IAS, विभोर भारद्वाज यांचा प्रेरणादायी प्रवास
अंजलि विश्वकर्मा यांचा प्रवास

अंजलि विश्वकर्मा या मूळच्या देहारादूनच्या रहिवासी.(people) त्यांचा जन्म ११ जानेवारी १९९३ रोजी झाला. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील अरुण कुमार हे अत्यंत साधे व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांनी IIT कानपूरमध्ये एयरोस्पेसमध्ये इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ऑइल कंपनीत नोकरी केली.

अंजलि यांनी फक्त भारतात नही तर जवळपस ६ देशांमध्ये काम केले आहे.(people) यूपीएससी परीक्षा देण्याआधी त्यांना ४८ लाख रुपये पॅकेज होते. परंतु त्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला.

अंजलि यांनी आपली लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली आणि त्या भारतात परतल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न केले. त्यांना पहिल्याच प्रयत्नात अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा २०२० मध्ये परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश मिळाले.

लहानपणी वडिलांचे छत्र हरपले, परदेशातील नोकरी धुडकावली; केली UPSC क्रॅक; IPS इल्मा अफरोज यांचा प्रवास
अंजलि यांची चर्चा

अंजलि या अनेकदा चर्चेत असतात. त्या नुकत्याच चर्चेत आल्या होत्या. कानपुर येथे ग्रीन पार्कमध्ये क्रिकेट मॅच सुरु होती. यावेळी आयपीएस अधिकारी आणि भाजपचे एमएलसी यांच्यामध्ये काही कारणामुळे वाद झाला. याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..