लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

राज्य सरकारने(govt) राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारच्या या योजनेला राज्यभरातून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या योजने अंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जात आहेत. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिलांसाठी ही योजना राबवली आहे. तसेच आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

राज्य सरकारने (govt)सप्टेंबर महिन्यापर्यंत महिलांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात देखील अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज देखील मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे. यासंबंधीचे मेसेज महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येत आहेत.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकूण मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावर पाठवले होते. यासंबंधित 17 ऑगस्टला पुण्यामध्ये एक कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्यावेळी जवळपास 1 कोटी 9 लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

अशातच आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाद्वारे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना देखील पैसे मिळणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ही 30 सप्टेंबर असल्याने त्यापूर्वीच महिलांनी अर्ज सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार की नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा:

संजय राऊतांना दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर, शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती

BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या

‘मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, पक्ष तोडण्याची गरज नव्हती…’ , सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य