या चौघांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये (Hotel)रुम बूक केल्या होत्या. मात्र हे चौघे या हॉटेलमध्ये कधीच पोहचलेत नाहीत. पाच दिवसांनी त्याचे मृतदेह सापडले.अमेरिकेमधून भारतीयांना हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथील वेस्ट व्हर्जनिया येथील धार्मिक स्थळाकडे जाणारं एक भारतीय वंशांचं कुटुंब अचानक गायब झालं. पाच दिवसांनंतर रविवारी या कुटुंबातील चौघांचे मृतदेह अत्यंत गूढ परिस्थितीमध्ये पोलिसांना आढळून आले. या चौघांबरोबर नेमकं घडलं काय? त्यांचा मृत्यू कसा झाला यासंदर्भातील तपास सध्या पोलीस करत आहेत.

मूळचे न्यूयॉर्कमध्ये राहणारं दिवाण कुटुंब अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथील एका आध्यात्मिक स्थळी जात होतं. त्यावेळी अचानक हे कुटुंब बेपत्ता झालं. 2 तारखेला या कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले. मार्शल काउंटी शेरिफ कार्यालयाने चार सदस्यांचे मृतदेह आढळल्याचे रविवारी जाहीर केले. मृतांमध्ये आशा दिवाण (वय 85), किशोर दिवाण (89), शैलेश दिवाण (86) – आणि गीता दिवाण (84) अशी मृतांची नावे आहेत.
न्यूयॉर्कमधील दिवाण कुटंब न्यूयॉ बफेलो येथून वेस्ट व्हर्जिनियामधील प्रभुपाद्स पॅलेस ऑफ गोल्ड या आध्यात्मिक स्थळाकडे जात होते. या कुटुंबाने शेवटचा संपर्क 29 जुलै रोजी केला होता. पेनसिल्व्हेनियातील एरी येथील पीच स्ट्रीटवरील बर्गर किंगमध्ये हे चौघेजण शेवटचे दिसून आल्याची माहिती आहे. तेव्हापासून ते सर्वजण बेपत्ता होते.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी हे मृतदेह सापडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या कुटुंबाच्या वापरात असलेली कार 29 जुलै रोजी दुपारी पेनसिल्व्हेनियामधील स्टेट टूपरच्या नंबरप्लेट रिडरमध्ये दिसून आली होती. तेव्हा ते आय-79 या महामार्गावरून दक्षिणेकडे जात होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी पिट्सबर्ग येथील एका मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर ते वेस्ट व्हर्जिनियामधील माउंड्सव्हिल येथे जाणार होते. तेथे पॅलेस लॉज हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने आधीच बुकिंग केले होते.
मात्र ते बुकिंग केलेल्या पॅलेस लॉज हॉटेलमध्ये(Hotel) पोहोचलेच नाहीत. अचानक हे चौघे गाडीसहीत गायब झाले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा त्यांना शोधण्याचा बराच प्रयत्न सुरु होता. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर या चौघांचे मृतदेह वेस्ट व्हर्जनिया येथे आढळून आले. या चौघांबरोबर नेमकं काय झालं? त्यांचा मृत्यू कसा झाला? यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणात सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहेत. एका दाव्यानुसार या चौघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा :
10 लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार हवा? मासिक EMI किती? जाणून घ्या सविस्तर माहती
वाढदिवसाच्या पार्टीमधून अचानक पत्नीचा हात सोडून अरबाज खान कोणाकडे गेला? Viral होतोय व्हिडीओ
पुण्यात खराखुरा सैराट! नवऱ्याला मारहाण करुन 28 वर्षीय तरुणीला बळजबरीनं…; घटना कॅमेरात कैद