हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा…. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा थेट घणाघात

संतोष देशमुख यांनी निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.28) सर्व पक्षीय नेत्यांकडून(political news) आणि राज्यभरातील नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर निषेध सभेतून सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप देखील व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, याच मुद्यावरून आता विरोधकांनी ही सरकारवर कडाडून टीका केली आहे.

काँग्रेसचे(political news) नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारला जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बीड प्रकरणात मोक्का लावू अशा वल्गना केल्या. मात्र अजून ही अटक झाली नाही. या घटनेचा सुत्रधार वाल्मिक कराड आहे. त्यांचा अनेक खुनामध्ये हात आहे. परिणामी त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बीडमध्ये मोर्चा निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. आज या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे याच मुद्दावरुन आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.मुंडे म्हणतात चौकशी करा, कुणाचे कुणाशी सबंध आहे हे तपासा. वाल्मिक कराडला शोधून आणा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. म्हणजे त्यांचा समावेश खुनाच्या गुन्ह्यात दिसेल. असंही वडेट्टीवार म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणतात त्यात तथ्य असू शकतं. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारलं, कारण मुख्य आरोपीपर्यंत पोहचू नये. तस यात ही तथ्य असू शकतं. या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासुन दुर ठेवलं पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा :

आणखी दोन देश आमने सामने भारताची चिंता वाढली

सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड अखेर शरण; CID ने पुण्यातून घेतलं ताब्यात

कोल्हापुरातील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू; दोघांना वाचवायला गेला अन् तिसराही बुडाला