‘तो’ Six बघून वानखेडेच्या ड्रेसिंगरुममध्ये धोनीही Shock! कॅप्टन कूलची Reaction झाली Viral

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जदरम्यान रविवारी वानखेडे(six) स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाने 20 धावांनी सामना जिंकला. या सामन्यामधील पहिल्या डावातील शेवटचे चार बॉल सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. शेवटच्या 4 बॉलसाठी फलंदाजीला आलेल्या महेंद्र सिंह धोनीने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीची पिसं काढली.

धोनीने 3 षटकांच्या मदतीने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या(six). योगायोग म्हणजे 20 धावांच्या फरकांनीच चेन्नईने हा सामना जिंकला. धोनीची ही तुफानी खेळी पाहून वानखेडेमधील चाहते बेभान झाले. मात्र स्वत: धोनी या सामन्यातील एक शॉट पाहून आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. हा शॉट मारला होता चेन्नईचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडने.

ऋतुराजने मारलेला हा फटका पाहून धोनी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला. रविवारच्या सामन्यात चेन्नईकडून अजिंक्य राहणे आणि रचिन रविंद्र यांनी सलामीची जोडी म्हणून मैदानात एन्ट्री घेतली. मात्र रहाणे लवकर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रहाणेला सुरुवातीला पाठवण्याचा डाव फसला आणि ऋतुराजला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मैदानात उतरावं लागलं.

आपला फॉर्म कायम ठेवत पॉवर प्लेमध्ये ऋतुराजने फटकेबाजी सुरु केली. दुसऱ्या बाजूला रचिन रविंद्र सावध खेळत होता. ऋतुराजने धावांचा वेग वाढवताना आकाश मधवाल आणि गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर सणसणीत षटकार लगावले. या दोन षटकारांसहीत ऋतुराजने यंदाच्या पर्वातील आपलं दुसरं अर्थशतक झळकावलं. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली.

सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये ऋतुराज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पिसं काढत फटकेबाजी करत होता. ऋतुराजने चौकार आणि षटकार लगावत ही ओव्हर संपवली. ऋतुराजने शेवटच्या बॉलवर पॉइण्टवरुन लगावलेला फटका पाहून ड्रेसिंग रुममधला धोनीही आश्चर्यचकित झाला.

ऋतुराज हा फटका मारण्यासाठी क्रिजमध्ये स्वत:साठी जागा तयार करत लेग साईडला सरकला. मिळालेल्या जागेचा वापर करत त्याने फूल टॉस चेंडू ऑफ साईडला सीमारेषेजवळ फिल्डींग करत असलेल्या रोमॅरियो शेफर्डच्या डोक्यावरुन सीमेपार धाडला आणि पंचांनी दोन्ही हात वर करत षटकार दर्शवणारा इशारा केला.

ऋतुराजने हा फटका मारल्यानंतर कॅमेरा ड्रेसिंग रुममधील धोनीवर पॅन झाला. त्यावेळेस धोनीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. त्याने या फटक्याला आपल्या हावभावांमधून दाद देताना भन्नाट शॉट होता असं दर्शवलं. मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये ऋतुराज गायकडवाडने 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऋतुराज 2 हजार धावांचा सर्वात वेगाने टप्पा ओलांडणारा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा :

आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

मंडलिक,माने यांचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करणार

सांगलीत मोठा ट्विस्ट; महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार, विशाल पाटील अपक्ष लढणार?