एल्विशनं खरंच महागडी कार विकत घेतली की भाड्यानं?

बिग बॉस ओटीटी 2′ चा विजेता एल्विश यादव हा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत होता. (car)आता एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एल्विशनं एक नवी गाडी खरेदी केली आहे. एल्विशनं त्याला मिळालेलं यश आणि लग्झरीयस लाइफस्टाइल पाहता मर्सिडीज जी-वॅगन खरेदी केली आहे. ते पाहून अनेक लोक तिची स्तुती करत आहेत. एल्विश यादव यामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

एल्विश यादवनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरू या नव्या गाडीचा (car)फोटो शेअर केला आहे. या फोटोत एल्विश यादवनं त्याची नवी मर्सिडीज-जी वॅगन दाखवले आहे आणि ते पाहून त्याचे काही चाहते त्याची स्तुती करत आहेत. त्यानं त्याच्या यूट्यूब चॅनलवरून एक व्लॉग देखील शेअर केला आहे. ज्यात चाहत्यांना त्या गाडीची एक झलक पाहायला मिळाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुरुंगातून बाहेर आल्याविषयी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

एकीकडे काही नेटकरी एल्विशचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे एल्विशवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं कारण त्याच्या वडिलांचे एक वक्तव्य ठरलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की त्याच्याकडे असलेल्या सगळ्या महागड्या गाड्या या भाड्याच्या असतात. एक नेटकरी म्हणाला, “त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं ना की त्याच्या सगळ्या गाड्या या भाड्याच्या आहेत आणि तो गाड्या भाड्यावर घेतो.” दुसरा नेटकरी एल्विशची खिल्ली उडवत म्हणाला की “मित्रांनो शांत रहा, भाड्यावर आहे.”

तिसरा नेटकरी म्हणाला, “लोनवर भैया सिस्टम.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “भावा, किती वेळासाठी भाड्यावर घेतली आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “पुन्हा जायचंय का तुरुंगात हवा खायला… मला कळतं नाही इतके अशिक्षित लोक त्याला फॉलो का करतात हे मला कळंत नाही. त्याला बॉयकॉट करा.” तिसरा नेटकरी म्हणाला, “सगळ्या गाड्या भाड्याच्या आहेत.”

एल्विशच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो ‘बिग बॉस ओटीटी’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसला होता. त्याशिवाय तो त्यानंतर म्यूजिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. दरम्यान, त्याशिवाय तो आता लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलच्या गाण्याचं प्रमोशन करताना दिसला.

हेही वाचा :

‘तो’ Six बघून वानखेडेच्या ड्रेसिंगरुममध्ये धोनीही Shock! कॅप्टन कूलची Reaction झाली Viral

निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सची एन्ट्री, ‘सोशल मीडिया’चा वाढला वापर;

सांगलीत मोठा ट्विस्ट; महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार, विशाल पाटील अपक्ष लढणार?