रोहित शेट्टीचा सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी 14’ हा प्रचंड गाजला आहे. मात्र आता ‘खतरों के खिलाडी 14’ चा विजेता समोर आला आहे. करण वीर मेहराने खतरों के खिलाडी 14 ची ट्रॉफी(trophy) जिंकली आहे. ग्रँड फिनालेच्या अंतिम स्टंटमध्ये करण वीरने प्रत्येक धोकादायक स्टंट अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. मात्र सर्वांना प्रश्न पडला असेल की? खतरों के खिलाडीच्या विजेत्याला बक्षीस म्हणून काय मिळाले.
खतरों के खिलाडी 14 चा विजेता करण वीर मेहराला बक्षीस म्हणून ट्रॉफीसह(trophy) तब्बल 20 लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय बक्षिसाच्या रकमेसोबतच त्याने नवीकोरी टोयोटा अर्बन कार देखील जिंकली आहे. या स्पर्धेदरम्यान अंतिम फेरीत करण वीरची स्पर्धा अभिषेक कुमार, गश्मीर महाजनी, शालिन भानोत आणि कृष्णा श्रॉफ यांच्याशी होती. मात्र या सर्व स्पर्धकांना पराभूत करून करण वीर मेहरा खतरों के खिलाडी 14 चा विजेता ठरला आहे.
‘खतरों के खिलाडी 14’ शो जिंकल्यानंतर करण वीर मेहराने भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, ‘मी जिंकलो आहे यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाहीये. कारण सतत मुलाखती देत असल्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे. तसेच असं वाटत आहे की मला ISI मार्क मिळाला आहे.’ असं अभिनेता म्हणाला आहे.
टीव्ही अभिनेता करण वीर मेहराने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे. संपूर्ण हंगामात त्याने सर्व कामे चोखपणे पार पाडली आहेत. प्रत्येक स्टंटमध्ये त्याने आपली ताकद आणि कौशल्य अनोख्या पद्धतीने दाखवले.
करण वीर मेहरा, अभिषेक कुमार, गश्मीर महाजनी, शालिन भानोत आणि कृष्णा श्रॉफ यांनी ‘खतरों के खिलाडी 14’ च्या अंतिम फेरीत टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. मात्र अखेर करण वीर मेहराने यामध्ये बाजी मारली आहे.
हेही वाचा:
भारताचा परकीय चलन साठा उच्चांकावर, 692.30 अब्ज डॉलरचा नवा विक्रम
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video