महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना(yojana) राबवली आहे. या योजनेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. अशातच जुलै महिन्यापासून तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनचा लाभ घेतला आहे.
मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची(yojana) अंमलबावणी करण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्या आहेत. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देण्याचे महायुती सरकारने जाहीर केले होते.
मात्र ही योजना सुरू होऊन तब्बल पाच महिन्यांहून अधिक काल उलटला आहे तरी अजूनही अंगणवाडी सेविकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. मात्र आता अनेक महिने उलटूनही अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मोबदल्याचे पैसे न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही जुलै महिन्यात सुरु झाली आहे. मात्र त्या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांवर देखील सोपवण्यात आलं होतं. परंतु, हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देण्यात येतील असे सरकारने जाहीर केलं होतं. मात्र या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा त्यामागचा मूळ उद्देश होता.
याशिवाय अंगणवाडी सेविकांनी देखील नेहमीचं काम सांभाळत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्याची कामगिरी देखील चांगल्या प्रकारे पार पाडली. परंतु, आता या योजनेच्या लाभापासून अंगणवाडी सेविका वंचित राहिल्या आहेत.
हेही वाचा :
लोकसभा झाल्या, विधानसभाही संपल्या आता लागले महापालिका निवडणुकीचे वेध
स्नायू कमकुवत, उंचीत वाढ; अंतराळात सुनीता विल्यम्सच्या शरीराचे होतेय नुकसान?
भान हरपून रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं तरुणीला पडलं महागात… Video Viral