‘पंजाब’ चुकीचे लिहिल्यामुळे दिलजीत दोसांझ ट्रोल; गायकाचा झाला संताप

पंजाबी गायक(Singer) दिलजीत दोसांझ त्याच्या ‘दिल-लुमिनाटी’ टूरमुळे चर्चेत आहे. गायकाच्या चाहत्यांना त्याची मैफल खूप आवडत आहे. त्याच वेळी, द्वेष करणारे त्याला वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल देखील करताना दिसत आहेत. अलीकडेच दिलजीतने चंदीगड कॉन्सर्टसाठी X वर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने पंजाब चुकीचे लिहिले आहे. सोशल मीडियावर हेटर्सनी गायकाला या प्रकरणावरून खूप ट्रोल केले आहे. आता विविध प्रकारच्या कमेंट्समुळे त्रस्त झालेल्या दिलजीतने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गायक(Singer) आणि अभिनेता दिलजीतने आपल्या ताज्या पोस्टमध्ये ‘Punjab’ ऐवजी ‘Panjab ‘ असे लिहिले होते. या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. याचदरम्यान जुन्या पोस्टमध्ये त्यांनी पंजाबसह भारताच्या ध्वजाची इमोजी देखील टाकली होती. मात्र, आता त्याची प्रतिक्रिया खूप चर्चेत आली आहे.

यावेळी पंजाबी गायक दिलजीतने द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने एका एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ‘कोणत्याही ट्विटमध्ये पंजाबचा झेंडा जोडलेला तर ते षड्यंत्र. तसेच, ट्विटमध्ये बेंगळुरू कार्यक्रमाचा उल्लेख केला की वाद. आणि ‘Punjab’ ऐवजी ‘Panjab’असे लिहिले असेल तर ते देखील षड्यंत्र.’ असे लिहून गायकाने पुढे लिहिले की, पंजाब हा शब्द ‘Punjab’ ऐवजी ‘Panjab’ लिहिला तरी तो सदैव पंजाबच राहणार आहे’ असे लिहून दिलजीतने नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसिद्ध गायक दिलजीतच्या पोस्टवर यूजर्स सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक वापरकर्ते म्हणतात की त्यांना ट्रोलर्सना प्रतिसाद देण्याची गरज नाही. यावर प्रतिक्रिया देताना दिलजीतने लिहिले की, ‘काही अडचण नाही. अन्यथा हे लोक पुन्हा पुन्हा ट्विट करून खोटे दावे खरे असल्याचे सिद्ध करतील. या कारणास्तव काउंटर करणे फार महत्वाचे आहे.’ असे त्याने लिहिले.

हेही वाचा :

दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई, ‘इतक्या’ कोटींचे मिळाले उत्पन्न

‘या’ पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा

तौबा-तौबा… पंजाबी गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मारामारी.. Video