इचलकरंजी महापालिका आणि डी. के. ए. एस. सी. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले

इचलकरंजी : आपत्ती काळातील सजगतेसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिका आणि डी. के. ए. एस. सी. कॉलेजच्या एन.सी.सी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे(Training) आयोजन मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी करण्यात आले.

या कार्यशाळेस महापालिका आयुक्त सौ. पल्लवी पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी केले. एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. लेफ्टनंट विनायक भोई यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेत कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यशाळेच्या(Training) मुख्य सत्रात श्री. संजय कांबळे यांनी एन.सी.सी. कॅडेट्सना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगत आपत्ती काळात वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली. महापालिकेच्या रेस्क्यू व वाहन विभागासह विविध विभागांचे अधिकारीही कार्यशाळेस उपस्थित होते, ज्यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी झाले.

शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे हायस्कूल व गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे एन.सी.सी. कॅडेट्स तसेच एन.सी.सी. अधिकारी श्री. मुलानी आणि श्री. बुनांद्रे यांनीही कार्यशाळेत सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी संपूर्ण एन.सी.सी. विभाग व सहभागी कॅडेट्सचे कौतुक करत या प्रशिक्षण उपक्रमाचे अभिनंदन केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली असून भविष्यात अशा प्रशिक्षणांद्वारे आपत्ती काळातील सामूहिक सजगता वाढवली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा :

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना दिलासा! 5000 जादा एसटी बसेसची घोषणा

पोस्टमन मामा या दिवशी येणार नाहीत — 21 जुलै रोजी पोस्ट ऑफिसचे व्यवहार बंद राहणार

स्वच्छ भारत अभियानात इचलकरंजी महापालिकेची घवघवीत कामगिरी – देशात ३३वा आणि राज्यात १६वा क्रमांक!