राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष(scam) मोहन पाटील यांना अटक आज (शुक्रवारी) पहाटे आर्थिक गु्न्हे शाखेने अटक केली. भाईंदर पूर्वेच्या अभिनव शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोहन पाटील यांचा अटकपूर्व जामीन 24 फेब्रुवारीला फेटाळला होता. तेव्हापासून मोहन पाटील फरार होते.
मोहन पाटील यांना अभिनव शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात(scam) आले होते. मात्र, त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये गैरव्यवहार केला होता. फक्त मध्यान्ह भोजनचे नाही संस्थेमध्ये आर्थिक अपहार, काॅम्युटरच्या निधीमध्येदेखील कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मोहन पाटील यांच्यावर होता.
न्यायलयामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणात तब्बल 32 तारखांनंतर फेब्रुवारी महिन्यात मोहन पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर मोहन पाटील फरार होता. मोहन पाटील हा राष्ट्रवादी NCP (अजित पवार गट) विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत.
मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोहन पाटील हे महापालिकेने नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिले होते. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई करत आज त्यांना अटक केली. अभिनव संस्थेसोबतच नवीन संस्थेकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (शुक्रवारी) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
साखरपुडा झाला होता, लग्न मात्र जमलं नाही…!
ऑपरेशन फोडाफोडी… ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार, 30 नगरसेवक फुटणार?
हे कसले अँगल्स, कुठे झूम करताय? पापाराझींवर भडकली अभिनेत्री